Sunday, January 3, 2021

घर बांधण्यासाठी वापरलेल्या लाकडाचे परिणाम

घर बांधण्यासाठी वापरलेल्या लाकडाचे परिणाम * दुधाचे वृक्ष- दूध नष्ट करतात . * फळ देणारे वृक्ष- संतती नष्ट करतात . * काटेरी वृक्ष- कलह वाढवतात . * ज्यावर कावळे बसतात असा वृक्ष - धनाचा क्षय . * स्मशानातील वृक्ष- मृत्युस कारणीभूत . * ज्यावर वीज पडली असा वृक्ष- भिती देतो . * वादळाने पडलेला वृक्ष- हवेची भिती देतो . * मार्गातील वृक्ष- कुलाचा विध्वंस करतो . * देववृक्ष- धनाचा नाश * अर्धभन्न वृक्ष- विनाश * अर्धशुष्क वृक्ष- धनाचा नाश * अत्यंत जीर्ण वृक्ष- घराचा क्षय * वेलींनी झाकलेला वृक्ष- दरिद्रता * सर्वांनीयुक्त वृक्ष- सर्पाचे भय .

मंगल चंडिका स्तोत्र वाचण्याचे फायदे

 कर्ज न होण्यासाठी , लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी , घरांत वाद - विवाद न होऊन सर्वांचे कौटुंबिक विचार एक राहण्यासाठी , घर , जमीन , या संबंधीत वादविवाद न होण्यासाठी व वास्तुदोष जाऊन भरभराट होण्यासाठी , विवाहातले अडथळे जाऊन विवाह त्वरीत होण्यासाठी देवी भागवत महापुराणांत मंगलचंडी देवीची ही उपासना आहे . विधी : दर मंगळवारी व शुक्रवारी सकाळी , दुपारी आणि रात्री हे स्तोत्र वाचावे . मसुरडाळ व गूळ , लाल वस्त्र , निरनिराळी लाल रंगाची फळे गरीबांना दान द्यावी . असे पाच मंगळवार कार्यसिद्धी होईपर्यंत करावेत . दरम्यानच्या काळात काही अडचण येत असल्यास मंगळवार वाढवावा .


* श्री मंगलचंडिका स्तोत्र * रक्ष रक्ष जगन्माता देवि मंगल चंडिके । हारिके विपदां हर्ष मंगल कारिके । हर्ष मंगल दक्षेच हर्ष मंगल दायिके । शुभे मंगल दक्षेच शुभे मंगल दायिके । मंगल मंगल दक्षेच सर्व मंगल मांगल्ये । सदा मंगलदे देवी सर्वेषां मांगल्ये ।। पूज्ये मंगलवारे च मंगलाभिष्ट देवते । पूज्ये मंगल भूपस्य मनुवंशस्य संतती ।। मंगलाधिष्ठिता देवि मंगलानांच मंगले । संसार मंगलधारे मोक्ष मंगल दायिनि । सारेच मंगलधारे सारेच सर्व कर्मणा । प्रति मंगळवारेच पूज्य मंगल सुखप्रदे ।। इति श्री मंगल चंडिका स्तोत्र संपूर्णम् ।।

Sunday, September 13, 2020

*✍🏽महाभारतातील दोन गूढ पात्रे नकुल - सहदेव.*

*✍🏽महाभारतातील दोन गूढ पात्रे नकुल - सहदेव.*

🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅🦅

पंडूची दुसरी पत्नी माद्री हिच्या पोटी भगवान अश्विन कुमार यांच्या आशीर्वादाने जन्मलेल्या या दोन पांडवांबद्दल काही आश्चर्यकारक गोष्टी -
.

नकुल आपली सुंदरता आणि मोहक चेहऱ्याच्या वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध होता. कौरवांची बहिण दुशला नेहमी त्याच्या सौंदर्याची स्तुती करत असे.

सहदेव हा एकमेव मुलगा होता, ज्याला पंडूने स्वतःच्या शरीराचे मांस खाण्यासाठी विनंती केली. वडिलांच्या आज्ञेचे पालन करून त्याने आपल्या वडिलांच्या मेंदूचा भाग खाल्ला. यामुळे सहदेवाला भूतकाळ आणि भविष्यकाळ पाहण्याची शक्ती प्राप्त झाली.

नकुल आणि सहदेव यांना प्राण्यांची संभाषणे समजायची. त्यांना वनस्पती आणि प्राणी यांचे विचार, संवाद आणि कृती समजत असे.

नकुल आणि सहदेव यांनी वैद्य देवता आणि त्यांचा जन्मदाता असलेल्या अश्विन कुमार यांच्याकडून आशीर्वाद मिळवला होता. अश्विन कुमाराकडून मिळालेल्या वरदानानुसार दोन्ही बंधूंना आयुर्वेदाचे प्रचंड ज्ञान होते. प्राण्यांच्या जखमा आणि हाडे कश्या दुरुस्त कराव्यात यावर देखील त्यांनी प्रभुत्व मिळवले होते. त्यांच्या उपचारांनी कोणीही सजीव तत्काळ बरा होत असे.

अज्ञातवासाच्या काळात नकुल आणि सहदेवने मत्स्यराज्याच्या पदरी वेश बदलून चाकरी केली होती. त्यांच्याकडे गोशाळेचे काम देण्यात आले होते. त्यांच्या देखरेखीखाली गायींनी जास्त दुध देण्यास सुरुवात केली, मरगळलेले घोडे सुदृढ आणि चपळ झाले.

नकुल पावसात घोडेस्वारी करून सुद्धा भिजत नसे. तो प्रकाशाच्या वेगाने घोडा पळवत असे. घोड्यावर बसून एखाद्या किल्ल्याच्या भिंतीवरून सुद्धा तो सहज उडी मारत असे....

अन्नपूर्णा या देवतेला महत्त्व.

अन्नपूर्णेचे महत्त्व........

🙏🕉️🙏

 अन्नपूर्णा या देवतेला एक अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. विशेषतः मी दत्तसंप्रदायात असल्यामुळे जेव्हा श्रीदत्ताला नैवेद्य दाखवला जातो ,त्यानंतर लगेच अन्नपूर्णेलाही दाखवला जातो. मला हे नेहमी कोडं पडायचे की अन्नपूर्णेला एवढे महत्त्व का दिले जाते.शेवटी मी अन्नपूर्णे संबंधी जेवढी माहिती मिळेल ती सर्व मिळवण्याचा प्रयत्न केला. यासंबंधी शंकर पार्वतीची कथा प्रसिद्ध आहे. अन्नाचे एवढे महत्त्व श्री शंकराला ही मान्य नव्हते. दोघांचा वाद झाला आणि पार्वती रुसून निघून गेली. पार्वती म्हणजे प्रत्यक्ष अन्नपुर्णाच. तीच निघून गेल्यामुळे जगात सर्वत्र हाहा:कार माजला. अन्न नसल्यामुळे लोकांचे हाल सुरू झाले शेवटी पार्वतीलाच दया आली आणि ती अन्नपूर्णेच्या स्वरूपात काशीला अवतीर्ण झाली. तिने अन्नदान सुरू केले. भगवान श्रीशंकरालाही मधली सगळी परिस्थिती अनुभवाला आल्यामुळे अन्नाचे महत्त्व समजले आणि ते स्वतः कटोरा घेऊन पार्वतीकडे भिक्षा मागायला आले. अन्नपूर्णेचे पहिले मंदिर त्यामुळेच काशीला आहे.

               जीवनात अन्नाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. समस्त प्राणीमात्र अन्नाशिवाय जगू शकत नाहीत. अन्न शरीराला शक्ती पुरवते आणि जीवनाची नवी उमेद सतत देत राहते. अन्न खाल्ले की शरीराला एक प्रकारचे समाधान मिळते .म्हणूनच अन्नदानाला अनन्यसाधारण महत्त्व दिले गेले आहे. ते अन्न सुग्रास असले पाहिजे. अन्न बनवणाऱ्याची मनस्थिती समाधानी असली पाहिजे. त्यांनी ते अन्न समाधानानी बनवले असले पाहिजे. तेच पदार्थ घेऊन वेगवेगळ्या लोकांनी बनवलेल्या अन्नाची चव वेगवेगळी असते. याचे कारणच हे की अन्न बनवणाऱ्याच्या वासना आणि मनस्थिती त्या अन्नात उतरत असते. म्हणून घरच्या अन्नपूर्णेला नेहमी समाधानात ठेवले गेले 

भक्ती करताना आपले संपूर्ण ध्यान देवावर असले

---------------------------------------
*भक्ती करताना आपले संपूर्ण*
*ध्यान देवावर असले पाहिजे.*
---------------------------------------



*प्राचीन लोककथेनुसार*

एक महिला नियमितपणे मंदिरात जात असे पण एक दिवस महिलेने पुजाऱ्याला सांगितले की, मी आता मंदिरात येणार नाही. पुजाऱ्याने यामागचे कारण तीला विचारले, महिला म्हणाली- या मंदिरात येणारे सर्वजण फक्त दिखावा करतात. 
काहीजण तर फक्त वाईट गोष्टी करतात. त्यांना देवाच्या पुजेशी काही देणे-घेणे नसते. अशा या ढोंगी लोकांना पाहून मला खूप वाईट वाटते. त्यामुळे मला यापुढे मंदिरात येण्याची इच्छा नाही.

त्यावर पुजारी म्हणाला की, जे आपल्याला योग्य वाटते तेच करा. पण शेवटचा निर्णय घेण्यापूर्वी तूम्ही माझे एक काम कराल?
महिलेने होकारार्थी मान हलवून म्हणाली, सांगा मला काय करावे लागेल?

पुजाऱ्याने त्या महिलेला एक दुधाचा ग्लास भरून दिला आणि सांगितले की, तूम्ही हा ग्लास घेऊन मंदिराच्या दोन प्रदक्षिणा पूर्ण करा पण दुधाचा एक थेंबही खाली पडता कामा नये. त्यावर महिला म्हणाली, हे तर अगदी छोटेशे काम आहे, मी लगेच करते. महिलेने मंदिराला प्रदक्षिणा मारायला सुरूवात केली. दुध सांडू नये म्हणून ती खूप काळजीपुर्वक चालत होती. तिने दोन्ही परिक्रमा पूर्ण केल्या आणि पुजाऱ्याकडे गेली. तेव्हा पुजाऱ्याने तिला विचारले की, तुम्हाला मंदिरात कोणी गप्पा करताना दिसले, किंवा आपण एखाद्या अशा व्यक्तीला बघितले जो, फक्त दिखावा करत आहे?

त्यावर महिलेने सांगितले, तिचे लक्ष तर दुधाकडे होते, त्यामुळे तिने मंदिरात काय सुरू आहे याकडे लक्ष दिलेच नाही. पुजारी हसले आणि म्हणाले, आपणही पुजा अशाच पद्धतीने केली पाहिजे. कोण काय करतंय, याकडे आपण दुर्लक्ष केले पाहिजे. फक्त आणि फक्त देवाचे ध्यान केले 

शिक्षण क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी /MPSC,UPSC परीक्षेत/स्पर्धा परिक्षेत यशस्वी होण्यासाठी सेवा

🔺1) शिक्षण क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी /MPSC,UPSC परीक्षेत/स्पर्धा परिक्षेत यशस्वी होण्यासाठी सेवा~~
     रोज सकाळी अंघोळीनंतर एका पेल्यात पाणी घेऊन त्यात 3 बोटे बुडवून खालील मंत्र 1 माळ जप करावा.
 सरस्वती मंत्र:-*
*ॐ ह्रीम् श्रां श्रीं हं सः थः थः ठः ठः।*
*सरस्वती भगवती विद्या प्रसादम कुरु कुरु स्वाहा ।।**
     माळजप झाल्यावर पेल्यातील पाणी /तीर्थ प्राशन करावे.
* या सेवेमुळे तल्लख बुध्दी होते
* शिघ्र विद्या प्राप्ती होते
* तोतरेपणा जातो
परिक्षेत यशप्राप्ती मंत्र:-*
*मोरि सुधारहि सो सब भांती।*
*जासु कृपा नहीं कृपा अघाती।।*
वरील सरस्वती मंत्र डोक्यावर हात ठेऊन 11 वेळा म्हणावा.
   

विष्णुसहस्रनाम वाचल्याचे फायदे

*विष्णुसहस्रनामाने आपल्या सर्व ग्रहपीडा, शत्रुपीडा,वास्तुदोष,पितृदोष,स्वभावदोष नाहीसे होतात.विघ्ने, संकटे दूर पळतात.*

१)दर बुधवारी ४वेळा विष्णुसहस्रनाम म्हटले तर आपल्या सर्व पितराना सद्गति मिळते.
२)नियमित रोज १२वेळा विष्णुसहस्रनाम ६ महिने म्हटले तर आपले सर्व प्रारब्ध नष्ट होते इहलोकी कीर्ती व मोक्ष प्राप्त होतो,म्हणजेच भुक्ति व मुक्ती दोन्ही प्राप्त होतात.३) १५,००० वेळा विष्णुसहस्रनाम म्हटले तर एक विष्णुयाग केल्याचे फळ मिळते असे पू.श्रीडोंगरे महाराज विरचित भागवतात लिहिले आहे.
४)एकादशीच्या रात्री १२वाजता स्नान करून विष्णुपुढे(राम/बालाजी/पांडुरंग/कृष्ण)तुपाचा दिवा व उदबत्ती लावून विष्णुसहस्रनामाचे १२ पाठ १२एकादशीना केले तर साक्षात भगवंताची क्रुपा होते
.५)४०दिवसांच्या रोज १२वेळा नियमित पठनाने अशक्य गोष्टी शक्य होतात.
६)सहस्र तुलसीपत्रानी सहस्रनामानी अर्चन अथवा तूप किंवा तुपलावलेल्या तिळांनी विष्णुसहस्रनामांनी हवन केले तर अतिशय उत्तम अनुभव येतात.
.७)बालकृष्णाला तुलसी अर्चन करून मुलांकडून रोज एकदा विष्णुसहस्रनाम म्हणवून घेतले तर त्यांचे उच्चार स्पष्ट व शुद्ध होण्यास मदत होते,ती तुळशीची पाने त्यांनी चावून खाल्ली तर त्यांची बुद्धी तेजस्वी होण्यास मदत होते
८)वास्तु दोष जाण्या करिता रोज तीन पाठ आठवडाभर करावेत,याची सुरुवात बुधवारीच करावी.तुपाचा दिवा व उदबत्ती ही लावावीच.
.९)बाहेरच्या त्रास असेल, संतती मतिमंद-गतिमंद असेल तर अशा व्यक्तीला रोज सकाळ-संध्याकाळ श्रीविष्णुसहस्रनामाचे पाठ ऐकवावेत.
१०)घरामधे कोणी व्याधिग्रस्त असेल तर विष्णुसहस्रनामाच्या पठनाने व्याधी नष्ट होऊन 
शरीराभोवती एक सुरक्षा कवच उभे राहते.
११)श्रीविष्णु मंदिरात बसून जो कोणी या स्तोत्राचा पाठ करतो,त्याचे सर्व अहित नाही

घर बांधण्यासाठी वापरलेल्या लाकडाचे परिणाम

घर बांधण्यासाठी वापरलेल्या लाकडाचे परिणाम * दुधाचे वृक्ष- दूध नष्ट करतात . * फळ देणारे वृक्ष- संतती नष्ट करतात . * काटेरी वृक्ष- कलह वाढवतात...